जायकवाडीचा पाणीसाठा ४१.४६ टक्क्यांवर

Foto
रमेश लिंबोरे
पैठणः नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीच्या प्रवाहात लक्षणीय वाढ झाली असून या प्रवाहाचे पाणी नाथसागर (जायकवाडी) जलाशयात दाखल होत आहे.त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात लाक्षणिक वाढ होण्यास सुरुवात झाली असून शनिवारी दुपारी  १२ वाजता जलाशयात ४१.४६टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.

नाशिक परिसरातील गंगापूर,दारणा तसेच गोदावरी खोर्‍यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे जायकवाडीकडे येणार्‍या पाण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे मराठवाड्यासाठी जीवनदायी ठरणार्‍या नाथसागर जलाशयातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.शनिवारी सकाळी सहा वाजता पाण्याची पातळी पुढीलप्रमाणे होती.

१५२२ फुट ४६३.९०६ मीटर क्षमता असलेल्या जलाशयाची पाणी पातळी१५०९.२६फुट, ४६०.ेमीटर, 
जिवंत साठा ९०० .७६ दलघमी म्हणजे ३१.७८ टीएमसी 
एकूण पाणी साठा १६३८.१८२ दलघमी ५७.८५ टीएमसी. 
आवक ७४७१८ क्यूसेक 
टक्केवारी ४१.४६ आहे .

८मागील वर्षी आजच्या दिवशी ७८.६७ टक्के पाणीसाठा होता. 
सध्याच्या पावसाची स्थिती कायम राहिल्यास जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
या वाढत्या साठ्यामुळे पिण्याचे पाणी,सिंचन तसेच आगामी रब्बी हंगामासाठी दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.